Dharma Sangrah
✕

Bhiwandi Building Collapsed तीन मजली इमारत कोसळली

Updated: शनिवार, 29 एप्रिल 2023 (15:58 IST)
 
ढिगाऱ्याखाली 15 ते 20 लोक अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. ग्राउंड प्लस ही 2 मजली इमारत असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती निवारणासह एनडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील चार सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. काही मजूरही तेथे अडकले आहेत. ठाणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
 
ही इमारत वालपाडा, कैलासनगर येथील वर्धमान कंपाऊंडमध्ये होती. या इमारतीच्या खाली गोदाम असून त्याच्या वर एक घर होते. या इमारतीची रचना निवासी होती की व्यावसायिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तळमजल्यावर गोदाम होते. जिथे मजूर काम करत होते. यातील काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले जात आहे. ही इमारत खूप जुनी असल्याचे सांगितले जाते. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई आणि नागपूर दरम्यान १२ विशेष गाड्या धावणार

नागपूरमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी जात असताना महिलेला ट्रकने चिरडले

LIVE: मुंबई आणि नागपूर दरम्यान आणखी बारा विशेष गाड्या धावणार

MPSC पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण! रोहित पवारांनी तुकाराम मुंडें कडे सुपूर्द केले महत्त्वाचे पुरावे

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत! तपासावर न्यायालयीन देखरेखीची मागणी; १८ नोव्हेंबरला सुनावणी

पुढील लेख
Show comments