Dharma Sangrah

रामदेव बाबा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

शनिवार, 13 मे 2017 (12:46 IST)

‘ भारत माता की जय’ घोषणेवरुन केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबा यांच्याविरोधात हरयाणा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मागील वर्षी रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेव बाबा यांना समन्स बजावले होते. हरयाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुभाष बत्रा यांच्या तक्रारीवरुन रामदेव बाबांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले.  ‘भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात यावा,’ असे विधान मागील वर्षी रामदेव बाबा यांनी केले होते. ‘भारत माता की जय या घोषणेवरुन रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे,’ असे काँग्रेस नेते सुभाष बत्रा यांचे वकील ओ. पी . चुघ यांनी म्हटले. याप्रकरणी १४ जुनला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश रामदेव बाबा यांना दिले आहेत.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments