Marathi Biodata Maker

मोदी आणि त्यांच्या विकास अजेंडावर चित्रपट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकास अजेंडावर आता चित्रपट बनविण्यात आला आहे. बिहारमधील सुरेश झा यांनी चित्रपटाती निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाबाबत बोलताना सुरेश झा म्हणाले की, ‘मोदी का गाव’ या सव्वा दोन तासाच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याच्या प्रदर्शनापूर्वीचे काम चालू आहे. हा चित्रपट बायोपिक नसला तरी याचे मेगा प्रिमीयर करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधानांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘मोदी का गाव’ चित्रपटात नरेंद्र मोदींसारखे दिसणारे मुंबईतील व्यावसायिक विकास महांते यांनी मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बिग बजेट नसून यात टीव्ही अभिनेता चंद्रमणि एम. आणि जेबा. ए हे भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पटणा, दरभंगा आणि मुंबईत करण्यात आले आहे. चित्रपटासाठी संगीतकार मनोजानंद चौधरी याने सात गाणी केली आहेत. तर चित्रपटाची सह निर्मिती तुषार ए. गोयल याची आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments