Marathi Biodata Maker

जितेंद्र यांचा चुलत भाऊ नितीन कपूर यांची आत्महत्या

बुधवार, 15 मार्च 2017 (08:54 IST)
गेल्या १८ वर्षांपासून बेरोजगार असल्याने आणि दीड वर्षापूर्वी तणावग्रस्त झालेल्या अभिनेता जितेंद्र यांचा  चुलत भाऊ नितीन कपूर (५८) यांनी गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. ‘हॅण्ड्स अप’, ‘मेरा पती सिर्फ मेरा है’, ‘कालीकलम’ या हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. १९८५मध्ये एकत्र काम करीत असताना सिने अभिनेत्री जयासुधा यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना निहार आणि श्रेयान नावाची दोन मुले आहेत. आंध्र प्रदेशच्या २००९मधील आमदाराच्या निवडणुकीत जयासुधा या काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. मात्र २०१४च्या तेलंगणाच्या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला.  बेरोजगारीमुळे ते गेल्या दीड वर्षापासून तणावात होते. महिनाभरापासून त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments