Festival Posters

प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:37 IST)

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे उपचारांसाठी त्यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

हॉस्पिटलमधील व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर डी.एस.राणा यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना डेंग्यूमुळे ताप आला होता. मात्र योग्य ते उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती ठीक आहे. हॉस्पिटलमधील अधिका-यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना ताप आल्यानंतर 23 ऑगस्टच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टर अरुप बसू यांच्या देखरेखीअंतर्गत प्रियंका गांधींवर उपचार प्रक्रीया सुरू होती.  दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments