संबंधित माहिती
- भयानक अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू
- हरभजन सिंग आता भाजपचे 'टर्बनेटर' बनले, पंजाबमध्ये मोठी खेळी खेळू शकतात
- "ते झालमुरीचं वचन देत आहे, मी तुम्हाला भेळपुरी खाऊ घालेन," ममता बॅनर्जी यांचे भाजपवर टीकास्त्र
- भरधाव ट्रकच्या धडकेत 11 भाविकांचा मृत्यू
- तामिळनाडूतील २३४ आणि पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा जागा, तर महाराष्ट्रातील दोन आणि गुजरातमधील एका जागेसाठी आज मतदान
राघव चड्ढा यांच्यासह 'आप'चे सात नेते आता भाजपचे खासदार झाले; राज्यसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली; 'आप'साठी हा एक मोठा राजकीय धक्का
आम आदमी पार्टीच्या (आप) सात खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणाला मंजुरी मिळाल्याने राज्यसभेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. या निर्णयामुळे सभागृहाच्या संख्याबळावर परिणाम झाला असून राजकीय वातावरणात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) सात खासदारांच्या भारतीय जनता पार्टीमधील (भाजप) विलीनीकरणाला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ सभागृहात 'आप'ची स्थिती कमकुवत झाली आहे. या सात खासदारांची नावे आता संसदेच्या अधिकृत वेबसाइटवर भाजप सदस्य म्हणून सूचीबद्ध झाली असून, त्यामुळे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
सूत्रांनुसार, या सर्व खासदारांनी शुक्रवारी अध्यक्षांना एक पत्र सादर करून भाजपचा भाग म्हणून मान्यता देण्याची विनंती केली होती, जी स्वीकारण्यात आली आहे. 'आप'साठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे, कारण या सात खासदारांनी पक्षावर आपल्या मूळ तत्त्वांपासून आणि विचारधारेपासून भरकटल्याचा आरोप केला.
दुसरीकडे, 'आप'ने रविवारी सभापतींकडे या सात खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.
शुक्रवारी 'आप' सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात खासदारांमध्ये राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश होता. या घडामोडीमुळे राज्यसभेचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
Edited By- Dhanashri Naik