राज्यात या ७ जिल्ह्यात येणार तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा
राज्यात सध्या उष्णता तीव्र वाढली असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहे. अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून ४० अंशाच्या वर तापमान आहे. काही भागात तापमान ४५ अंशाचा वर गेला असून नागरिक गरमीने हैराण झाले आहे.
हवामान विभागाने कोकण-गोवा विभागातील काही जिल्ह्यात आणि काही तुरळक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यातील ७ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने ३ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून या मध्ये अमरावती, अकोला, वर्धा यांचा समावेश आहे तर उर्वरित ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलक्या सरी ते मध्यम सरी बरसणार आहे. तसेच ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit

