मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही : शरद पवार
मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
याआधी शरद पवार यांनी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांशी चर्चा केल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.