मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (12:07 IST)

कॅनडामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले

earthquake
कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया प्रदेशच्या उत्तरी किनाऱ्यावर रविवार दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामध्ये एका भूंकपाची तीव्रता 6.5 मोजण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी समोर आली नाही.
 
अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षण ने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी3:20वाजता झालेल्या पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 एवढी मोजली गेली.
 
तसेच याचा केंद्रबिंदू 1,720 किलोमीटर उत्तर मध्ये असलेल्या हैदा ग्वाई द्वीपसमूह जवळ 33 किलोमीटर खोलात होता. ‘नैसर्गिक संसाधन कॅनडा’ ने सांगितले की, कमीतकमी एक तासानंतर त्याच क्षेत्रामध्ये 4.5 तीव्रतेचा दूसरा भूकंप आला.
 
अमेरिकी त्सुनामी इशारा केंद्र ने सांगितले की, या भुंकामुळे त्सुनामी येण्याचे कोणतेही संकट नाही. व कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. 

Edited By- Dhanashri Naik