Biodata Maker marathi
✕

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 5 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले

Updated: सोमवार, 25 एप्रिल 2022 (16:11 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्या ठिकाणी पीजी तयार करण्यात येत होता. ज्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू होते. सोमवारी अचानक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. त्यानंतर लगेचच प्रशासनाला माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले. आतमध्ये किती मजूर अडकले आहेत याची नेमकी माहिती उपलब्ध नाही, मात्र 5 जण गाडले गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
 
या घटनेबाबत दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी सांगितले की, हे कोणाचे तरी घर आहे ज्याला त्याची दुरुस्ती करायची होती. इमारत धोक्यात असल्याची नोटीस आम्ही ३१ मार्च रोजी चिकटवली होती. आम्ही 14 एप्रिल रोजी पोलीस, एसडीएम यांनाही कळवले होते, पण काम थांबले नाही. घटनेचा तपास करण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2-3 लोक आत अडकले आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments