गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. निळू फुले
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (09:23 IST)

निळू भाऊ पुण्यतिथी विशेष 2021: अष्टपैलू कलावन्त निळू भाऊ फुले

दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका केल्या आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली.त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली आहे.त्यांचे 'बाई वाड्यावर या '..हे सुपरहिट डायलॉग मुळे ते आजही लोकांचा मनात जिवंत आहे.
 
त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ कृष्णाजी फुले होते.त्यांना निळू फुले किंवा निळूभाऊ फुले या नावाने ओळ्खतात.त्यांचा जन्म 25 जुलै 1931 रोजी पुण्यात झाला.
 
त्यांना अभिनयाची आवड लहान पणा पासूनच होती.त्यांचे कुटुंब खूपच सामान्य होते.त्यांच्या वडिलांनी भाजी विकून मुलाचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत पूर्ण केले.
निळू भाऊंची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यांनी सुरुवातीच्या काळात एका उद्यानात माळी म्हणून काम देखील केले.
 
सामाजिक बांधिलकी मुळे त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम करण्यास सुरुवात केली.त्यांचा संपर्क वसंत बापट ,पु.ल.देशपांडे यांच्याशी झाला.त्यांच्या कलागुणांना तिथेच वाव मिळाला.त्यांना वाचनाची आवड होती.
 
रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला .त्यांनी लेखन केले आणि 'उद्यान'हे नाटक लिहिले.पु.ल.देशपांडे यांच्या पुढारी नाटकातून त्यांनी ''रोंगे''ची भूमिका साकारून आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले.अभिनेते म्हणून ते 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातून पुढे आले.
 
त्यांनी नायक आणि खलनायक अशा अनेक भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांचा मनावर सोडली.त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत 140 हुन अधिक मराठी चित्रपट आणि 12 हिंदी चित्रपटात अभिनय केले आहे.त्यांचे विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाईंडर 'या नाटकातील साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.   
त्यांनी रजनी मुथा यांच्याशी लग्न गाठ जोडली.निळूभाऊंचे निधन पुणे येथे 13 जुलै 2009 रोजी झाले. 
ते आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.