हरूनही जिंकला विजेंद्र....
|
| |
याच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्हर टाईम करणा-या त्या वृध्द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्या तरुणाचे नाव आहे विजेंद्रसिंग
|
|
|
बीजिंग ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणे शक्य झाले नसले, तरीही आजवरची सर्वांत चांगली कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली ही त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब.
| |
2004 च्या अथेन्स ऑलम्पिक स्पर्धेतही त्याने सहभागी घेतला होता. मात्र तेथे त्याचे आव्हान फार काळ टिकू शकले नाही. 2006 च्या राष्ट्रकूल स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या नील पर्किग्न्सचा पराभव केला. मात्र तेथे द. आफ्रिकेच्या बोंगानी एम्वेल्सेसकडून त्याला हार पत्करावी लागली. 2006 च्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये 75 किलोपेक्षा कमी वजनगटातही त्याने कास्य पदक पटकाविले आहे.
बीजिंग ऑलम्पिकमध्ये झांबियाच्या बाडू जॅकचा 13-2 च्या मोठ्या फरकाने पराभव करून त्याने आपले आव्हान उभे केले. त्यानंतर त्याने थायलंडच्या अंखान चोम्फुफुगलाही पराभूत केले. उपउपांत्य सामन्यात त्याने साऊथ पॉच्या कार्लोस गोंगोरा याला 9-4 ने पराभूत करून आपले कास्य पदक निश्चित केले. भारताला बॉक्सिंगमध्ये आजवर मिळालेले हे पहिले कास्य पदक ठरले असले तरीही तमाम भारतीयांना त्याच्याकडून क्युबाच्या इमिलिओ कोरेआ याला पराभूत करून रौप्य पदक मिळविण्याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
