शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:49 IST)

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच मोजमाप असतात. व्यक्तिमत्त्व म्हणजे "एखाद्या माणसाच्या नैसर्गिक,मनोवैज्ञानिक आणि वागणुकीच्या घटकांचे एकत्रितरीत्या समन्वय आणि संयोजन करणे हीच संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. " संपूर्ण व्यक्तिमत्त्व विचार,व्यवहार,दूरदृष्टी,सुसंकृत वर्तन, वर्तनशील विचार, कार्य करण्याची पद्धत आणि आयुष्याबद्दलच्या दृष्टिकोनामुळे घडते.व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू बदलणे अवघड आहे परंतु व्यक्तिमत्त्वाला वळण देणे शक्य आहे.आपल्या व्यक्तिमत्त्वाचे घडण कसे करता येईल.जाणून घेऊ या.
 
* परिवर्तन स्वीकार करा- 
जीवन परिवर्तनशील आहे हे सत्य स्वीकार करा. जीवनात असे काहीच नाही जे परिवर्तनशील नाही. प्रत्येक वस्तूमध्ये बदल होतोच म्हणून भूतकाळात जगू नका. यथार्थवादी बना,आपल्या वर्तमानात जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या. 
 
* संकुचित दृष्टीकोन बदला-
आपला दृष्टीकोन जीवनाची स्थिती आणि दिशा निश्चित करतो.कधी ही संकुचित मानसिकता किंवा दृष्टीकोन ठेवू नका.आपली मानसिकता जेवढी लहान असेल आपले विचार देखील तसेच असतील. म्हणून आपल्या बघण्याचा विचार करण्याचा दृष्टीकोन बदला तो संकुचित ठेऊ नका. प्रत्येक परिस्थितीकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघा.
 
* स्वभावात बदल आणण्याऐवजी वागणुकीत बदल आणा-
आपला स्वभावच आपली खरी ओळख असते. परंतु हे बदलणे अवघड आहे. आपण स्वभावाला न बदलता आपल्या वागणुकीला बदलू शकतो. असं करून आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा करू शकतो. म्हणून माणसाचा स्वभाव कसा ही असो आपले वर्तन नेहमी योग्य ठेवा. आणि व्यावहारिक राहा. 
 
* सकारात्मक विचार ठेवा-
नकारात्मक विचार व्यक्तीला आतच गुरफटून टाकतो .तर सकारात्मक विचार माणसाला ऊर्जा देतात. सकारात्मक विचार नेहमी चांगले परिणाम देतात. नकारात्मक विचार तणावाकडे नेतात.म्हणून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा.
 
* अनावश्यक क्रियाकलापांवर आळा घाला-
आपल्या दिवसभरात असे बरेच काम असतात जे आपला वेळ वाया घालवतात. आपल्या दिनचर्येचा व्यवस्थित आणि संयोजित करा. जे काम आपले वेळ वाया घालवतात असे काम करू नका. असं केल्याने आपला वेळ वाचेल आणि आपली ऊर्जा इतर कामासाठी कामी येईल.
 
* शिस्तबद्ध राहा-
आयुष्यात शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. शिस्तबद्धता माणसाला जबाबदाऱ्या हाताळायला आणि प्रत्येक कामाला सहजपणे करण्यास मदत करते. अशिस्तबद्धता आपल्याला इतरांपेक्षा खूप मागे ठेवते, म्हणून आयुष्यात शिस्तबद्धता महत्त्वाची आहे.शिस्तबद्धतेने वागावे. 
 
* आळशीपणा सोडा-
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो. आळशीपणा मुळे एखादे काम करण्यास टाळतो. त्या मुळे त्या पासून होणारे नुकसान देखील सहन करावे लागते. आळशीपणाने वागणे चांगले नाही. या मुळे प्रगती होत नाही आणि माणूस मागे पडतो. म्हणून ही सवय बदला.  
 
* आपल्या कमतरता ओळखून दूर करा- 
आपण सर्व माणसे आहोत आणि प्रत्येकामध्ये कमतरता असणे साहजिकच  आहे. या जगात कोणताही माणूस परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये काही गुण-दोष आढळतात. म्हणून आपल्या गुणांना वाढवा आणि कमकुवतपणा ओळखून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा.  
 
*माणुसकीला जागा द्या-
आयुष्यात प्रत्येक माणूस व्यस्त आहे पण आपण माणूस आहोत हे विसरता कामा ना ये. आयुष्यात एखाद्या गरजूला मदत करा. माणुसकी जपून त्याला त्याच्या कठीण परिस्थितीत मदत करा. 
 
* मैत्रीपूर्वक व्यवहार ठेवा- 
आपल्या व्यवहाराला मैत्रीपूर्ण ठेवा, कोणाशीही गैरवर्तन करू नका, तुटक वागू नका.मैत्रीपूर्ण व्यवहार करणाऱ्याला सर्व पसंत करतात. दुसऱ्यांना वाईट बोलणारे, वाईट वागणाऱ्या लोकांकडे कोणीच जात नाही. इतरांशी सलोख्याने वागणाऱ्यांशी लोक बोलतात. म्हणून नेहमी इतरांशी मैत्री पूर्ण व्यवहार ठेवा. 
या काही टिप्स अवलंबवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे चांगल्या प्रकारे घडण करू शकतो.