आयआयएम, यशाचा नवा मूलमंत्र
भारतीय व्यवस्थापन संस्थांना (आयआयएम) आता व्यवस्थापनाचा (मॅनेजमेंट) नवा मंत्र मिळाला आहे. आयआयएमचे प्राध्यापक आता नवे मॅनेजर घडविण्यासाठी पुस्तकी ज्ञानाशिवाय वास्तविक जीवनातील अनुभवांचा उपयोग करून घेत आहेत. अहमदाबाद आयआयएममध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच्या रूपात विद्यार्थ्यांना जणू यशाचा नवा मूलमंत्र गवसला आहे. आयआयएम, अहमदाबादमधील विद्यार्थ्यांना आता अभ्यासासोबत वास्तविक जीवनातील अनुभवही शिकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आयआयएमने यशाचा नवा मूलमंत्र दाखवून दिला आहे. नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, स्टेज टेअरिंग, वत्कृत्त्व, निर्णय क्षमता आदीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ते निश्चितच वेगळे असणार आहे. कारण वास्तविक जीवनातील जिवंत अनुभव हे विद्यार्थ्यांना स्वत: जवळून अनुभवत येणार आहे. यात जगातील विशिष्ट लोकांचे अनुभव, कॉर्पोरेट जगतातील व्हिडियो रिकॉर्डिंग व यशस्वी उद्योजकांचे विचार सांगितले जाणार आहे. हा अभ्यासक्रम टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. गोपालकृष्णन् यांच्या देखरेखीत तयार करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आले.