काय, स्मरणशक्ती वाढवताय?
PR
PRआपल्या मेंदूला शब्दापेक्षा चित्र व प्रतिमा लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून फोटोग्राफिक मेमरी म्हणजे तल्लख स्मरणशक्ती असते. त्यामुळे वस्तूचे नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्याच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करावे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही प्रयोग करता येतात...
1) वस्तुंची लांबलचक यादी लक्षपूर्वक वाचा. क्रम बदलू नका. यातील प्रत्येक वस्तूचा पुढच्या वस्तूशी काहीतरी संबंध जोडा. तो जितका अतार्किक, अवास्तव, गंमतीशीर असेल तितके ते बरे. हे चित्र तयार झाले की, नावे त्याच क्रमाने धडाधडा म्हणता येतील. तेव्हा त्या वस्तू पाहण्याची आवशक्यता भासणार नाही.
2) बॅंकचे चौदा आकडी खाते क्रमांक अथवा मोबाईलचा दहा आकडी क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी त्याचे तुकडे पाडा. प्रत्येक तुकड्यातील आकड्यांचा परस्परांशी काहीतरी संबंध लावा. क्रम, सम-विषम, गुणाकार, बेरीज, अशा गणितातल्या सोप्या संज्ञांचा त्यासाठी वापर करता येईल.
3) नव्याने ओळख झालेल्याशी बोलताना शक्य तितक्या वेळ त्याचे नाव उच्चारा. मग ते पक्के लक्षात राहते. त्याच्या चेहर्यातला वेगळेपणा जाणून घ्या. लांब नाक, मोठे डोळे, पिंजारलेले केस आदींचे मनातल्या मनात कार्टून तयार करून घ्यावे.
4) अभ्यास करतानाही अधिक चित्रे, नकाशे, आकृत्या, काढण्याची सवय लावा. ही चित्रकला सुबक नसली तरी स्मरणा काम त अचून करते, यात मात्र शंका नाही.
