'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं केलं स्काय डायव्हिंग
भारताला ऑलम्पिक मध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा नीरज चोप्रा सध्या आपली सुट्टी आनंदाने मालदीव्ह मध्ये घालवत आहे. सध्या तो शांत समुद्राचा आनंद घेत आहे. त्याने दुबईत आपल्या आनंदाचे क्षण घालवत मस्त एन्जॉय करत दुबईत स्काय डायव्हिंगचा अनुभव घेतला.आणि त्याचा आनंद करण्याचा एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे.त्यात त्याने एक कॅप्शन दिले आहे.की विमानातून उडी घेतल्यावर सुरुवातीला भीती वाटली नंतर मज्जा आली. आपण देखील स्काय डायविंग करण्याचा अनुभव एकदातरी नक्की घ्या असे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
नीरज चोप्रा ने ऑलम्पिक मध्ये भालाफेकीत उत्तम कारकिर्दी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते.त्याला गोल्डन बॉय म्हणून नाव दिले गेले. सध्या तो आपले आनंदाचे क्षण दुबईत आणि मालदीव्ह मध्ये घालवत आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह, अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा दुसरा खेळाडू आहे. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने 13 वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.