बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

विश्वनाथ आनंद

नाव : विश्वनाथ आनंद
जन्म : ११ डिसेंबर १९६९
ठिकाण : चेन्नई
देश : भारत
खेळ : बुध्दिबळ
व्यवसायिक पदार्पण : २००३

विश्वनाथ आनंद हा भारताचा पहिला ग्रॅडमास्टर आहे. माजी विश्वविजेता आहे. सध्या तो २७९९ गुणांसह जगात दुसर्‍या कमांकावर आहे. २८०० गुणांपुढे जाणार्‍या चार बुद्धिबळपटूपैकी तो एक आहे. १९९७ पासून तो पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे. आनंदने १९८३ साली राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तेव्हा तो फक्त १४ वर्षांचा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने इंटरनॅशनल मास्टर किताब‍ जिंकला. तर १९८५ मध्ये तो राष्ट्रीय विजेता ठरला. त्याने हा किताब सलग दोनदा जिंकला. तो अतिशय वेगाने चाली करायचा. त्यामुळे त्याला लायटनिंग किडस् असे टोपण नाव पडले. १९८७ मध्ये त्याने जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पधेचे विजेतेपद पटकावले. हे विजेतेपद पटकवणारा तो पहिला भारतीय ठरला. १९८८ मध्ये तो भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला.


पुरस्का
अर्जुन पुरस्कार
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार