Dharma Sangrah
✕

पुणेकरांची वाहन ओळख बदलणार! MH-12 ची जागा आता MH-61 घेणार

Updated: सोमवार, 31 ऑगस्ट 2026 (13:23 IST)
ALSO READ: पुण्यात घराच्या दाराआड किरकोळ वादावरून लेकानं आईचा गळा चिरून निर्घृण हत्या केली
पुणे आरटीओमधील सध्याचे अल्फान्यूमेरिक नोंदणी क्रमांक संपले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, MH-12 कोड अंतर्गत शेवटच्या ZZ मालिकेतील सर्व 9999 अंक या आठवड्यात संपले आहेत. यानंतर, आरटीओ नवीन MH-61 कोड अंतर्गत नोंदणी सुरू करण्याची तयारी करत आहे.  
 
 परिवहन आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, MH-61 कोड अंतर्गत नवीन वाहनांची नोंदणी सोमवारपासून सुरू  झाली आहे. सध्या, राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) प्रणालीची काही बॅकएंड चाचणी सुरू आहे. 
 
 MH-12  झेडझेड’ ही वाहन नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता ‘MH-61 बी’ ही मालिका पसंती क्रमांकासाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नियमित क्रमांकाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुचाकीधारकांना नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
ALSO READ: पुण्यात PMPML ची जीवघेणी 'ओव्हरलोडिंग': धावत्या बसमधून पडून विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
सर्वसामान्यांसाठी नोंदणी सुरू होण्यापूर्वी, फॅन्सी क्रमांकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वाहन मालकांना या विशेष क्रमांकांसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. फॅन्सी क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, नवीन MH-61 कोड अंतर्गत सामान्य वाहनांची नोंदणी सुरू होईल.  
ALSO READ: पुण्यातील कसबा पेठ येथे वादातून झालेल्या गोळीबारात पती-पत्नी जखमी
MH-61 बी’ मालिकेतील पसंती क्रमांकाची ( Pune RTO) प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने नियमित क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा सध्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नवीन नियमित मालिका सुरू झाल्यानंतरच वाहन खरेदी आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सध्या परिवहन विभागाकडून चौस क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक सप्टेंबरपासून ‘MH-61’ मालिका नियमित वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली  आहे.
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत ७२.९६% विक्रमी मतदान! उमेदवारांचे भवितव्य २७ ऑक्टोबर रोजी ठरणार

‘महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात द्या, शिस्त आणण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही’; राज ठाकरेंची राज्यासाठी काय योजना?

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

पुढील लेख
Show comments