Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन महिलांनी एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

Updated: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (22:34 IST)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तक्रारदार महिला नात्याने एकमेकींच्या चुलत जावा आहेत आणि त्यांनी एकमेकींच्या नवऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत.
 
एका महिलेने सांगितले की, माझ्या जावेच्या नवऱ्याने माझ्यावरती शेतातील गोठ्यात बलात्कार केला, तर दुसरीचे म्हणणे आहे की, तिच्या जावेच्या नवऱ्याने तिला लॉजवर नेऊन बलात्कार केला. भोर तालुक्यामध्ये बलात्काराचे हे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 
यात ती महिला म्हणाली की, ती ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता चुलत दिराने तिला शेतातील गोठ्यात बोलवून तिचा विनयभंग केला. या गुन्ह्यात एका महिलेने तिच्यावर 10 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान बलात्कार केल्याप्रकरणी तीन लोकांवरती आरोप केला आहे. अन्य दोन लोकांनी गोठ्यामध्ये येऊन सामूहिक बलात्कार  केला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
 
त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ठरवण्यात आलेल्याच्या व्यक्तीच्या पत्नीने देखील पीडित महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने तक्रारीत सांगितले की, ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर राहत्या घरी आणि लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

अकोल्यात धारदार शस्त्राने वार करून नंतर दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या

LIVE: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,०८६ कोटी हस्तांतरित

राहुल गांधींचे लक्ष महाराष्ट्रावर, आता पुण्यानंतर नाशिककडे कूच, २ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण शिबिराला संबोधित करणार

अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहले; सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल सहा धारदार प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments