सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (08:43 IST)

राज्यसभा निवडणूक: भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

dhananjay mahadik
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. भाजपकडूनराज्यसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. धनंजय महाडिक उद्या अर्ज भरणार आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.