मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:24 IST)

राज्यसभा निवडणुकीत मत बाद; आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव

mumbai highcourt
नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद केले होते. त्यांच्या या निर्णया विरोधात आ.कांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता १५ जून रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत २८५ मतदान झाले होते. पण, कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर २८४ मतांची मोजणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. कांदे बरोबरच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे यशोमती ठाकुर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावरही आक्षेप घेण्यात आले होते. पण, यात कांदे वगळून सर्वांवर असलेले आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे त्यांचे मत वैध झाले. पण, कांदे यांचे अवैध ठरले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांचे एक मत कमी झाले. मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.