मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (12:47 IST)

आजपासून 10वीची परीक्षा

10 th exam form today
महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या परीक्षा आजपासून म्हणजेच 15 मार्चपासून सुरू होत आहेत. यासाठी शिक्षण मंडळाने तयारी पूर्ण केली आहे. आजपासून कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहेत.
 
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्रासाठी परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. परीक्षा 04 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे. बोर्डाने परीक्षेपूर्वी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली असून, त्याविषयी विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाऊन पाहता येईल. हे करण्यासाठी अधिकृत वेबसाइट पत्ता आहे – mahahsscboard.in
 
यावर्षी सुमारे 16 लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेला बसणार आहेत.
 
बारावीची परीक्षा यापूर्वीच 4 मार्चला सुरू झालेली आहे. कोरोनाचे नियम पाळून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये 70 ते 100 मार्कांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार असून 40 ते 60 मार्कांचा पेपर लिहीण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ मिळणार आहे.