संबंधित माहिती
- भीषण स्फोटात 7 जण जिवंत जळाले, मृतांची संख्या वाढू शकते
- जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा स्फोट, 5 जणांचा मृत्यू
- रुग्णालयात उंदराने चावा घेतल्याने कर्करोगग्रस्त 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला
- Cockroach in Bread Pakoda एयरपोर्टवर 200 रुपयांच्या ब्रेड पकोड्यात झुरळ, प्रवाशाने शअेर केला अनुभव
- शाळकरी मुलांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली, 3 मुलांचा जागीच मृत्यू
जयपूर अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 30 जणांची प्रकृती गंभीर
Jaipur News: राजस्थानच्या जयपूरमध्ये शनिवारी गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या 14 वर पोहोचली. एका अधिकारींनी ही माहिती दिली. अपघातात जखमी झालेल्या 30 हून अधिक जणांना अजूनही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या एका अधिकारींनी शनिवारी दिली आणि त्यामुळे मृतांचा आकडा 14 वर पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार जयपूर-अजमेर महामार्गावर भांक्रोटा परिसरात शुक्रवारी पहाटे एका ट्रकने एलपीजी टँकरला धडक दिली, परिणामी आगीत 35 हून अधिक वाहने जळून खाक झाली. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 35 जण जखमी झाले आहे. राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिनवसार यांनी शुक्रवारी सांगितले की, जखमींपैकी अर्ध्या लोकांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत भाजलेल्या बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे एलपीजी टँकर आणि ट्रकची धडक होऊन भीषण आग लागली.
Edited By- Dhanashri Naik
