Cockroach in Bread Pakoda एयरपोर्टवर 200 रुपयांच्या ब्रेड पकोड्यात झुरळ, प्रवाशाने शअेर केला अनुभव
Cockroach in Bread Pakoda जर तुम्ही चहासोबत स्नॅक्स खात असाल आणि अचानक त्यातून झुरळ बाहेर आला तर काय स्थिती होईल याचा विचार केला तरी किळस येते. मात्र असाच काहीसा प्रकार जयपूर विमानतळावर एका व्यक्तीसोबत घडला. असं असलं तरी विमानतळावर मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात, त्यावरुन त्या खाद्यपदार्थात झुरळ शिरणे म्हणजे निष्काळजीपणाचा कळसच म्हणावा. डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशा घृणास्पद गोष्टी सापडण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.
जयपूर विमानतळावर डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने चहासोबत खाण्यासाठी नाश्ता म्हणून ब्रेड पकोडा ऑर्डर केला. तो खाल्ल्याबरोबर पहिल्या चावल्यानंतर त्यातून एक छोटासा मेलेला झुरळ बाहेर आला. ते पाहताच ते घाबरले आणि दुकानदाराकडे याबाबत तक्रार केली.
एयरपोर्टवर जिथे सर्व काही स्टैंडर्डच मिळत असेल अशी कल्पना असते कारण तेथे साधारण 20 रुपयांचे पदार्थ 200 रुपयांना सहज विकले जाता. अशात क्वालिटीची अपेक्षा करणे चुकीचे तर नाही पण असे असूनही खाद्यपदार्थांतून मेलेले किडे बाहेर पडणे म्हणजे आरोग्याशी खेळणेच झाले. आता डीपी गुर्जरने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काही खाद्यपदार्थांमध्ये मृत कीटक सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, एका कुटुंबाने हर्षेचे चॉकलेट सिरप विकत घेतले होते, ज्यामध्ये एक मेलेला उंदीर सापडला होता. मात्र, कुटुंबातील काही सदस्यांनी ते सरबत वापरल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी तक्रार केली पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच बर्गर किंग बर्गरमध्ये मृत कीटक आढळून आला होता.