मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 डिसेंबर 2024 (16:29 IST)

शाळकरी मुलांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली, 3 मुलांचा जागीच मृत्यू

accident
जिल्ह्यातील चारभुजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देसुरी येथील नाल्यात स्कूल बस उलटल्याने तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर 17 हून अधिक मुले गंभीर जखमी झाली. जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने राजसमंद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राचेठी गावातील एका इंग्लिश मीडियम शाळेतील 65 मुले सहलीसाठी रणकपूर आणि परशुराम महादेव येथे जात होती. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देसुरी की नाल येथील पंजाबी मोडमधून स्कूल बस जात असताना अचानक बस उलटली, यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर 17 हून अधिक मुले जखमी झाली. जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थली दाखल झाली अणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच मुलांना चांगले उपचार देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या.

या घटनेबाबत बोलताना मुख्य शिक्षणाधिकारीम्हणाले, शाळेच्या प्रशासनाला मुलांच्या सहलीबाबत कोणतीही माहिती नव्हती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
 
Edited By - Priya Dixit