Maharashtra Marathi Breaking News Live Today: हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री धनंजय मुंडे सध्या नागपुरात आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर भाष्य केले. धनंजय मुंडे म्हणाले, 'विरोधक काही बोलतील. मी याबद्दल बोलेन. ज्याचे उत्तर देणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठीण जाईल. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
11:50 AM, 21st Dec
नितीन राऊत यांनी विधानसभेत नागपूरच्या नारा नॅशनल पार्कचा सरकारने विकास करावा असा मुद्दा उपस्थित केला
11:00 AM, 21st Dec
'मुंबई आधी महाराष्ट्राची, मग भारताची' म्हणाले आदित्य ठाकरे
10:50 AM, 21st Dec
नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांड: वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली
10:50 AM, 21st Dec
गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले
09:52 AM, 21st Dec
महाराष्ट्र विधानसभेने राज्याच्या तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले
09:52 AM, 21st Dec
संजय राऊतांच्या घरी दोन जणांनी केली रेकी, माझ्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे म्हणाले शिवसेना युबीटी नेते
09:33 AM, 21st Dec
विधानपरिषदेत विरोधक गोंधळ घालत म्हणाले- भाजपला आली सत्तेची मस्ती
09:32 AM, 21st Dec
मुंबई विमानतळावर कस्टम पथकाची मोठी कारवाई, 11 कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करून एकाला अटक