मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 21 डिसेंबर 2024 (11:41 IST)

गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले

Gadchiroli News: हिंसाचाराने भरलेल्या जीवनाला कंटाळून आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. विशेषत: पोलीस विभागाने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 680 नक्षलवाद्यांनी जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दोन दहशतवादी नक्षलवाद्यांनी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर सरकारने आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दोन दहशतवादी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण कल्यामुळे आता जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे.

Edited By- Dhanashri Naik