शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 21 डिसेंबर 2024 (11:40 IST)

माजी विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत घुसला, मुलांना पाहताच केला हल्ला, 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

child death
Zagreb News: क्रोएशियाची राजधानी जगरेब येथे एका शाळेमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. शुक्रवारी एका माजी विद्यार्थ्याने शाळेवर चाकूने हल्ला करून सात वर्षीय विद्यार्थिनींची हत्या केली आणि चार जण जखमी केले. प्रेको परिसरातील एका शाळेत सकाळी 9:50 वाजता हा हल्ला झाला. 19 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोराने स्वत:लाही इजा करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हल्लेखोर शाळेत घुसला आणि थेट पहिल्या वर्गात गेला आणि मुलांवर हल्ला केला. क्रोएशियाचे गृहमंत्री दावर बोजिनोविक यांनी सांगितले की, तीन मुले आणि एक शिक्षक जखमी झाले आहे, तर एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर हल्लेखोरही जखमी झाला आहे. 19 वर्षीय हल्लेखोर हा शाळेचा माजी विद्यार्थी असून तो जवळच्या परिसरात राहतो, असे बोजिनोविक यांनी सांगितले. त्याने स्वत:वर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Edited By- Dhanashri Naik