मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2024 (08:43 IST)

भंडाऱ्याच्या पवनीमधील गौशाळेत 30 जनावरांचा मृत्यू

30 animals died in a cowshed in Bhandara's Pavani
भंडारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्याच्या पवनी येथील गौशाळेत चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
 
गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं 30 जनावरे मृत पावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे.
 
गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हतं. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
 
दरम्यान, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत ठेवण्यात आलं होतं. मात्र, यातील 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor