1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 4 people were blown away by a speeding car in Nagpur

नागपुरात भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने 4 जणांना उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

नागपुरात हिट अँड रन चा प्रकार घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना धडक देण्याची घटना केडीके कॉलेज जवळ घडली आहे. या घटनेत 4 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. 
 
शनिवारी दुपारी भरधाव वेगात आलेल्या स्कोडा कारने 4 जणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. काही लोक रस्त्याच्या कडेला उभे असताना एक भरधाव कार येऊन त्यांना जोरदार धडक देत असल्याचे दिसून येते.
 
 फुटेज मध्ये दिसत आहे केडीके कॉलेज चौकात एका भाजी विक्रेत्याकडे काही लोक भाजी विकत घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने भाजीपाला विक्रेताच्या गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहे. 

अपघातानंतर काही लोक जखमींच्या मदतीसाठी धावून आले अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाला ताब्यात घेतले. 
 
कार चालक मद्यपान करून होता की नाही याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. 
या प्रकरणी नंदनवन पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit    
 
 
पुढील लेख
फ्लॅट देण्याचे आश्वासन देत 4 कोटी रुपयांची फसवणूक