1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मार्च 2025 (17:41 IST)

नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक, वकिलांनी सांगितले निर्दोषांना शिक्षा होऊ नये

nagpur violence
Nagpur violence: महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शहरात हिंसाचार उफाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. या हिंसाचारात मोठ्या संख्येने पोलिसही जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितनुसरा पोलिसांनी आरोपींचा शोध तीव्र केला आहे. आतापर्यंत ६० दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ पोलिस ठाण्यात ६ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्याच वेळी, सीसीटीव्हीच्या आधारे १०० ते २०० लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. नागपूरमध्ये दंगल करणाऱ्या २७ जणांना काल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २१ मार्चपर्यंत पीसीआर कोठडीत पाठवले आहे.आरोपींच्या वतीने वरिष्ठ वकील आसिफ कुरेशी यांनी उलटतपासणी घेतली आणि पहाटे २.३० वाजेपर्यंत युक्तिवाद सुरू राहिला. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना, महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्यांना आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे पण निरपराधांना शिक्षा होऊ नये.
आसिफ कुरेशी म्हणाले, ज्यांनी डीसीपी अर्चित चांडक, डीसीपी निकेतन कदम यांच्यावर हल्ला केला, सरकारी मालमत्ता जाळली आणि महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. वकिलाने सांगितले की, अटक केलेल्यांमध्ये काही मुले आहे, काही जखमी आहे, काही रुग्णालयात आहे, त्यापैकी २७ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik