शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (10:41 IST)

अहमदनगरमध्ये 4 वर्षाच्या लहान मुलाचा टाकीत पडून मृत्यू

child death
महाराष्ट्रातील अहमदनगर मधून एक वाईट बातमी समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्याने चार वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात तेव्हा घडला जेव्हा हा चिमुकला गल्लीमध्ये खेळत होता. हा लहान मुलगा जेव्हा टाकीत पडला तेव्हा कुटुंबियांना या गोष्टीची कल्पना देखील नाही. 
 
तसेच खूप वेळ झाला मुलगा घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. शंका आल्यानंतर नंतर त्यांनी टाकी बघितली तर त्यामध्ये मुलाचा मृतदेह आढळला.हे घटना अहमद नगरमधील मुकुंद नगरमधील आहे असे सांगण्यात येत आहे.  
 
ही घटना रविवारी संध्याकाळची सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी मुलगा खेळून झाल्यानंतर घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला. खूपवेळ शोधल्यानंतरही चिमुकला सापडला नाही. शेवटी त्यांनी जवळपास असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यामध्ये दिसले की चिमुकला खेळता खेळता टाकीत पडला आहे. रात्री मुलाचा मृतदेह टाकीमधून बाहेर काढण्यात आल्या नंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.