नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
नवी मुंबईत 34 वर्षीय व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली.
मंगळवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उरण मध्ये दोन महिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 फसवणूक आणि 406 गुन्हेगारी विश्वासघात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2023 ते एप्रिल 2025 दरम्यान झाली.
आरोपी महिलांनी तक्रादाराला उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन कपड्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाकडून 77 लाख रुपये घेतले आणि काही दिवसानंतर महिलांनी परतावा दिला नाही किंवा मूळ गुंतवणूक परत नाही केली, तेव्हा तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडितेने पोलिसांनी संपर्क साधला त्या नंतर पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केली नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit