गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (10:50 IST)

वसईत 5 वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर चढली कार, व्हिडीओ आला समोर

palghar
Palghar News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका कार चालकाने पाच वर्षांच्या चुमुरड्यावर कार चढवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुधवारी ही घटना घडली असून मुलगा चमत्कारिकरित्या वाचला पण त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वसई पूर्वेतील शिव भीम नगर, नाईकपाडा, वालीव परिसरात एका प्रवाशाने ओला ॲपवरून कार बुक केली होती. चालक व प्रवासी गाडीत बसल्यानंतर कारसमोरील मैदानात पाच वर्षांचे बालक खेळत होते. त्यानंतर ड्रायव्हरने त्याच्याकडे न बघता मुलाच्या अंगावर गाडी पळवली. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाने कार थांबवली नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला.
 
एका मिनिटाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वळण घेत असताना प्रवाशानी भरलेली कॅब एका मुलाला चिरडत असल्याचे दिसून येते. आश्चर्याची बाब म्हणजे, अपघातानंतर मूल स्वतःहून उभे राहून घरी निघून गेले, तर शेजारी उपस्थित असलेली इतर मुले त्याच्याकडे धावत आली. सध्या बालकाला वालीव येथील वालदेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला, डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहे.

Edited By- Dhanashri Naik