Marathi Biodata Maker
✕

बाप्परे, आधार तीर्थ आश्रमामध्ये लहान मुलाचा गळा दाबून हत्या

Updated: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (20:46 IST)
 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातच एका चार वर्षाच्या मुलाची गळा अावळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लहान मुलाच्या संशयास्पद मृत्यूची बातमी मिळताच पोलिस घटनास्थळीदाखळ झाले होते. पोलिसांच्या तपासानंतर या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 
 
मृत चिमुकला अवघ्या चार वर्षांचा असून तो उल्हासनगर येथील होता. त्याचा माेठा भाऊ देखिल याच आश्रमात हाेता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, नववीतील एका मुलाचे या लहान मुलाचे भांडण झाले हाेते त्यातूनच ही हत्या झाली का याचा तपास आता केला जात आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री ही घटना घडली. 
नववीच्या वर्गातील एका मुलाशी हत्या झालेल्या मुलाचे भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या हत्येचा भांडणाशी काही संबंध आहे का ? याची देखील कसून चौकशी सुरु आहे. दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले होते ही माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

सीजेपी नेते अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन मंजूर; जामीनपत्रानंतर आता आंदोलनाचे काय होणार?

पिंपरी-चिंचवड येथील सरकारी रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात दारू पार्टी! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर निलंबित

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला; १० वर्षांत संघाला तीन आयपीएल विजेतेपद मिळवून दिले

LIVE: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसराचे नूतनीकरण केले जाईल

गोंदिया-जबलपूर रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला गती; २३ स्थानके आणि ५०७ पुलांचा समावेश

पुढील लेख
Show comments