गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (12:19 IST)

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर बनणार

महाराष्ट्राच्या भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. हे संपूर्ण हिंदुस्थानातील एकमेव असे मंदिर असणार आहे.छत्रपती शिवाजी राजेंचे मोठे भक्त साईराम आणि त्यांचे भाऊ राज चौधरी यांनी हे पुण्य कार्य आपल्या हाती घेतले असून त्यांनी स्वतःचं मालकीची तब्बल दीड एकर पेक्षा जास्त जमीन या मंदिरासाठी अर्पण केली आहे.त्यांच्या सह गावातील मंडळी देखील या पुण्य कार्यासाठी हातभार लावत आहे.आणि मंदिराच्या कार्याला सुरुवात केली आहे.  
 
या त्यांच्या चांगल्या कार्याची माहिती मिळतातच काही मराठा संघटना यांनी  दखल घेऊन मंदिर उभारण्याच्या पाहणी साठी आले.त्यांनी तिथल्या परिसरात वृक्षांची लागवड देखील केली.या कार्यात सहभागी होण्यासाठी दूरवरून कुटुंबियांसह आले असल्याचे वृत्त समजले आहे.
 
छत्रपती शिवरायांच्या मंदिर उभारण्याचे हे पावन कार्य भिवंडीच्या शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी गेल्या 2 वर्षा पासून कोरोना कालावधीच्या सर्व अडचणीवर मात केले असून चौधरी बंधूंनी उभारलेल्या या मंदिराचे 80  टक्के बांधकार्य पूर्ण केले आहे.या मंदिराची उंची 55 फूट आहे.या मंदिराला शिवकालीन गडकिल्याचे रूप येण्यासाठी 36 फूट उंचीचे प्रवेश द्वार तयार केले आहे.
 
 छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्यदिव्य मंदिर इतिहासातील पाऊलखुणा जपण्यासाठी उभारण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे याचा प्रवेश द्वाराची रचना शिवकालीन गडकिल्यास्वरूपाची करण्यात आली आहे.