सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (15:45 IST)

कोणी मराठी का नाही बनू शकत पंतप्रधान? नक्कीच बनेल - फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले की वर्ष 2050 पर्यंत महाराष्ट्राहून एकापेक्षा जास्त लोक पंतप्रधान बनू शकतात. त्यांनी ही गोष्ट 16व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्धटानं सत्राला संबोधित करताना म्हटली.  
 
या दरम्यान त्यांना विचारण्यात आले की काय 2050 पर्यंत महाराष्ट्राचा कोणीही व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकतो, कारण महाराष्ट्राचा कोणताही नेता अद्याप देशाचा पंतप्रधान बनला नाही आहे, यावर ते म्हणाले, 'का नाही, जर आम्ही संपूर्ण भारताला बघितले तर बर्‍याच अर्थात जर कोणी राज्य केले आहे तर ते आहे महाराष्ट्रीयन आणि आमच्यात अटकपर्यंत पोहोचण्याची क्षमता देखील आहे.’’ अटकवर 18व्या शताब्दीत मराठा सेनेने विजय प्राप्त केली होती. ही जागा आता पाकिस्तानात आहे.  
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘‘माझे मानणे आहे की 2050 पर्यंत आम्ही देशाच्या उच्च पदावर एकच नव्हे तर एकापेक्षा जास्त महाराष्ट्रीयांना बघू. ’’