गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (10:15 IST)

गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन चालणार

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा विशेष गाड्या चालवणार.आता मध्य रेल्वे तब्बल 40 गाड्या सुरु  करणार.या पूर्वी 72 गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या.
 
या मध्ये काही विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांसाठी बुकिंग 7 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या गाड्यांमध्ये मुंबई-सावंतवाडी रोड दोन फेऱ्या करणार,पनवेल-सावंतवाडी या गाडीच्या चार फेऱ्या होणार,लोकमान्य टिळक टर्मिनल्स-कुडाळ या गाडीच्या 6 फेऱ्या होणार,लोकमान्य टिळक टर्मिनल्स-मडगाव  या गाडीचे 6 फेऱ्या,पनवेल-कुडाळ 6 फेऱ्या, पनवेल - कुडाळ विशेष गाडीच्या ४ फेऱ्या, पुणे - मडगाव/करमळी - पुणे विशेष या गाडीच्या दोन फेऱ्या, पनवेल - करमळी/मडगाव - पनवेल विशेष या गाडीच्या दोन फेऱ्यां होणार.
 
तसेच पश्चिम रेल्वेने देखील गणेशोत्सोवच्या काळात 8 गाड्यांच्या विशेष फेऱ्या करण्याच्या निर्णय घेतला असून  काही गाड्या मुंबई सेंट्रल आणि बांद्रे येथून निघणार.तर इतर काही गाड्या वसई मार्गाकडून कोकणात जाणार.