1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. A tree in Yavatmal district made a farmer a millionaire

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

Rakt Chandan tree made the farmer rich
एका झाडाने एक शेतकऱ्याला रातोरात करोडपती केल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. जवळपास 100 वर्ष जुने असलेले झाड ने त्याला करोडपती बनवले आहे. 
 
हे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी गावातील आहे. इथे केशव शिंदे नावाच्या एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित 7 एकर शेतातील लाल चंदनाच्या झाडाने त्याचे नशीब पालटले.
2013-14 पर्यंत शिंदे कुटुंबाला हे माहित नव्हते की त्यांच्या शेतातील हे झाड रक्तचंदन प्रजातीचे आहे. 
त्या काळात रेल्वे सर्वेक्षण करण्यात आले या मध्ये कर्नाटकातील काही अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाची पाहणी केली असून त्यांनी शिंदे कुटुंबियांना हे झाड रक्तचंदनचे असल्याचे सांगितले. 
या झाडाला बाजारात खूप जास्त किंमत आहे. हे ऐकल्यावर शिंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला. 
या नंतर रेल्वेने जमीन ताब्यात घेतली मात्र किंमत देण्यास नकार देऊ लागले. शिंदे कुटुंबीयांनी झाडाचे खाजगी मूल्यांकन केल्यावर त्याची किंमत सुमारे 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. 
 
तरीही रेल्वेने किंमत देण्यास नकार दिला. या नंतर शिंदे कुटुंबाने हे प्रकरण न्यायालयात नेण्याचे ठरवले  
सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठा पर्यंन्त पोहोचले न्यायालयाने मध्यरेल्वेला झाडाच्या किमतीच्या बदल्यात 1 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच रकमेतून 50 लाख रुपये शिंदे कुटुंबाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच शिंदे कुटुंबाला रक्कम काढण्याची परवानगी दिली. या सोबत उर्वरित किमतीचे योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्याला संपूर्ण भरपाई देण्याचा सूचनाही देण्यात आल्या. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार