शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (16:11 IST)

लोकल ट्रेनच्या डब्यात महिलेने दिला बाळाला जन्म

baby
ट्रान्सहार्बर मार्गावरील उरण -नेरळ लोकलमधून  प्रवास करणाऱ्या एका महिलेने चालत्या लोकलच्या डब्यात एका मुलीला जन्म दिला. ही महिला उरणच्या भवरा  परिसरात राहणारी असून तिचा नवरा मोलमजुरी करतो. महिला ला सोमवार रात्री पासून त्रास होत होता तिची तपासणी कारण घेण्यासाठी तिचा नवरा मुझमी सय्यद तिला रुग्णालयात घेऊन गेला तिला बरे वाटत होते म्हणून ते दोघे सकाळी 7:50 च्या लोकलने उरण ते नेरुळला.
चालले असताना लोकल 8:20 च्या सुमारास बामन डोंगरी भागात आल्यावर तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या.

महिलांच्या डब्यात इतर महिला पुढे येऊन तिला मदतीचा हात दिला आणि तिच्या अवती -भवती पडदे लावून तिची प्रसूती केली. महिलेने एका मुलीला जन्म दिला. पोलिसांनी  रेल्वे पोलिसांच्या मदतीने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरूळच्या रुग्णालयात दाखल केले बाळ व बाळाची आई दोघेही सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 
  Edited by - Priya Dixit