मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (19:44 IST)

युवकाचा जीवघेणा स्टंट

stant
सातार्‍यात पोगरवाडीला जाणार्‍या घाटात एसटी बसच्या पाठीमागाील बाजूस धोकादायक पद्धतीने लटकून एक तरुण प्रवास करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अकॅडमीत प्रशिक्षण घेणार्‍या या तरुणांवर प्रशिक्षकाचे नियंत्रण नसल्याचे जीवघेणे स्टंट प्रशिक्षणार्थीकडून केले जात आहेत. 
 
पोगरवाडी येथील करिअर अकॅडमी पोलीस आणि आर्मी भरतीसाठी मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या मार्गावरच घाटातून आणि रस्त्यावर प्रशिक्षणार्थी मुले धावत असतात. रविवारी भर पावसात रस्त्यावर हे युवक अत्यंत धोकादायक पद्धतीने धावत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या हुल्लडबाज प्रशिणार्थी मुलांवर प्रशिक्षकाचे लक्ष नसल्यानेच हे धोकादायक उद्योग ही मुले करत आहेत.