शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 सप्टेंबर 2025 (18:54 IST)

अकोला: शोरूम मालकाच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Suicide
महाराष्ट्रातील अकोला मध्ये सिंधी कॅम्प येथील शोरूम मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छळ केल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाज गोपाळराव शिरसाट असे मृत व्यक्तीने नाव असून  १५ सप्टेंबर रोजी मलकापूर परिसरातील रेल्वे मार्गावर आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या पत्नीने शोरूम मालक  आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात शोरूम मालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.