शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 एप्रिल 2017 (22:59 IST)

१ मे ला पाण्याच्या विपुलतेसाठी श्रमदान करूया : आमिर खान

aamir khan
एक मे महाराष्ट्र दिनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी, पाण्याच्या  विपुलतेसाठी  श्रमदान करूया असं आवाहन आमिर खान व किरण राव यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीयो अपलोड केला असून पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
 
महाराष्ट्र दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रियनांसाठी अभिमानाचा दिवस आहे असं सांगताना किरण राव व आमिर खान यांनी सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये 1000 पेक्षा जास्त गावं भाग घेत असल्याची माहिती दिली आहे. तसेच, ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देण्याची एक संधी या निमित्तानं शहरी लोकांना उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. या दिवशी एक तास किंवा दोन तास जसे जमतील तसे या कामासाठी द्यावेत असं आवाहन आमिर खाननं केलं आहे.