मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2017 (14:13 IST)

चार बालकांचा नदीत बुडून मृत्यू

accident in river

पळसे येथे दारणा नदीत आज सकाळी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले पोहण्यासाठी नदीत गेली होती.मात्र या सर्वाना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामध्ये बुडालेल्या त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृतदेह हाती आलेल्या मुलांची ओळख पटली आहे. सुमीत राजेंद्र भालेराव(१५), कल्पेश शरद माळी (१४) अशी त्यांची नावं आहेत.ही चारही मुलं घराबाहेर पडली होती.  उशिरापर्यंत ती घरी परतली नाहीत म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा नदीपात्राजवळ तीन मुलांचे कपडे आढळून आले. त्यावरून नदीपात्रात शोध घेतला असता आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले.