1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (10:36 IST)

पुणे पोर्शे कार प्रकरणातील आरोपींना पिझ्झा-बर्गर देण्यात आला, सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांच्या आरोप

sanjay raut
पुण्याच्या भरधाव वेगाने जीव घेणाऱ्या पोर्श कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर देण्याचा आरोपी सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी केला आहे. महाराष्ट्राच्या पुण्यात भरधाव वेगात असलेल्या 'पोर्श' कारने धडक दिल्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर देण्यात आला होता. त्याची कसून चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला हे सत्तेतील लोकांनी उघड करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत म्हटले आहे. मी देवेंद्र फडणवीसांकडून याचे उत्तर मागत आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नये. पोलिसांवर राजकीय दबाब कोणाचा आहे?  मुलाला जामीन कसा मिळाला. त्याला कोणी मदत केली? पिझ्झा बर्गर का दिले ? या प्रकरणामागील सत्य आलेच पाहिजे. 
दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सरकारकडे केली असून, किशोरला ताब्यात घेतल्यावर त्याला बर्गर पिझ्झा देण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

पोलिसांनी एका श्रीमंत मुलाला मदत केली असून मुलाला 2 निष्पापांचा जीव घेतला आहे. मुलगा मद्यधुंद अवस्थेत असून तो मद्यपान करत असल्याचा व्हडिओ देखील समोर आला आहे. तरीही त्याला पाठीशी घालून त्याची मदत केली. त्याला मदत अजित पवार गटाच्या आमदारांनी केल्याचे ते म्हणाले. 
तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संजय राऊतांच्या आरोपाचे खंडन करत म्हटले आहे की घटनेनन्तर अल्पवयीन मुलगा कोठडीत असताना त्याला पिझ्झा बर्गर काहीच दिले नाही. 

Edited by - Priya Dixit