गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:04 IST)

रूग्णालयातून खूनाच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचे पलायन !

Accused of murder escapes from hospitalरूग्णालयातून खूनाच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचे पलायन ! Ahamadnagar Maraathi  News Marathi Regional News In Webdunia Marathi
अहमदनगर य्र्थिल खूनाच्या प्रयत्न गुन्ह्यातील अटक आरोपी आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) याने जिल्हा रूग्णालयातून दुपारी पलायन केले. तोफखाना पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान त्याच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आहेत. मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिल्याने आकाश गायकवाड याने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नगर शहरामध्ये ही घटना घडली होती.
 
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकाश गायकवाड विरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्याला जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी आणले होते.