रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:36 IST)

लातूर मध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात

murder
सध्या महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. सध्या बलात्काराचे प्रकरण वाढत आहे. बदलापूरच्या प्रकरणांनंतर राज्यातून पुन्हा महिलेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. 
लातूर मध्ये एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. 

सदर घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा गावातील आहे.घरकाम करणाऱ्या 70 वर्षीय मोलकरणीला आपल्याच घरात एका 35 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला नंतर महिलेची गळा आवळून हत्या केली. घटनेच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. आरोपीने मृत महिलेला स्वतःच्या घरात महिलेला नग्नावस्थेत डांबून ठेवलं .

शेजारी राहणाऱ्यांना आरोपीच्या घरातून दुर्गन्ध आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराचे दार उघडल्यावर त्यांनी महिलेच्या मृतदेहाजवळ आरोपीला बसलेलं पहिले. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाला ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविले.  

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. प्रकरणांनंतर संतप्त लोकांनी प्रदर्शन करत आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 
Edited by - Priya Dixit