गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (16:50 IST)

नाशिकात किरकोळ वादांनंतर लोखण्डी रॉड ने तरुणाला बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

नाशिकात किरकोळ वादानंतर एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची लोखंडी रॉड ने मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची हृदयद्रावक हत्या केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यावर हा प्रकार घडला. या वेळी अनेक जण उपस्थित होते. कोणीही मारेखोर तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तिथून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

सदर घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. नाशिकरोडच्या सिन्नर फाटा परिसरात प्रमोद रामदास वाघ यांच्यावर लोखण्डी रॉडने हल्ला करण्यात आला जुन्या काही कारणांवरून वाद झाल्यामुळे हा हल्ला करण्यात आला. 

मयत प्रमोद हे दुचाकीवरून सर्व्हिसरोड वरून जात असताना आरोपीने आपल्या एका साथीदारांसह त्याला अडवले आणि त्यांच्यात संभाषण झाले नंतर बाचाबाची सुरु झाली.

आरोपीने जवळच टायरच्या दुकानातून लोखंडी रॉड आणली आणि मयत प्रमोदच्या अंगावर 13 वार केले त्यात प्रमोदचा मृत्यू झाला. नंतर आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit