मालेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा विजय
मालेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून पहिल्याच फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
ब वर्ग गटातून मतमोजणी झाली त्यात अजित पवारांनी 91 मत मिळवून आघाडी घेतली या गटात 102 मतांपैकी 101 मते वैध ठरलीअसून 91 मते अजित पवारांना मिळाली आहे.
या निवडणुकीत एकूण 19 हजारांहून अधिक मतदार असून 88.48 टक्के मतदान झाले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 90 उमेदवार रिंगणात असून मतदार आज एकूण 21 संचालक निवडणार आहे.
अजित पवारांच्या नेत्तृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात बळीराज बचाव पॅनल, शरद पवारांचे माजी सहकारी चंद्रकांत तावरे यांच्या नेत्तृत्वाखाली असलेले सहकार बचाव पॅनल मध्ये लढत असणार आहे. या निवडणुकीत अजित पवार यांनी जिंकल्यावर आपणच अध्यक्षपदी असण्याचे जाहीर केले आहे.
Edited By - Priya Dixit