गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (11:44 IST)

आळंदी कार्तिकी यात्रा 2022 : आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

palkhi 8
आळंदी मध्ये कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी भाविकांची माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. माऊलींच्या मंदिराच्या महाद्वारात आणि मंदिरात आकर्षक फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली आणि भाविकांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली. भाविकांची गर्दी वाढत असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे. या साठी सुमारे अडीच हजाराहून अधिक पोलीस बळ लावले आहे.

पोलिसांचा 24 तास पहारा असून 24 तास सीसीटीव्ही ची नजर देखील लोकांवर असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरी पाकीटमार सारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सुमारे 2500 पोलिसांचा बंदोबस्त कार्तिकी यात्रेसाठी करण्यात आला आहे. 
 
Edited By - Priya Dixit